सानपाडा येथील भव्य दैनंदिन मार्केटचे भूमीपूजन

अविरत वाटतचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, १९ डिसेंबर २०१८:

सानपाडा- पामबीच भूखंड क्रमांक २२ येथे स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत आणि रुपाली भगत यांच्या प्रयत्नांनी भव्य दैनंदिन मार्केट उभारण्यात येणार आहे. १८ डिसेंबर रोजी या भव्य दैनंदिन मार्केटचा भूमीपूजन सोहळा नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्याहस्ते आणि युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या उपस्थित पार पडला.

  • सानपाडा -पाम बीच येथे दैनंदिन मार्केट नसल्यामुळे नागरिकांना खासकरून महिला वर्गाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. ही अडचणी लक्षात घेता स्थानिक प्रतिनिधी म्हणून नगरसेविका वैजयंती भगत यांनी सिड़को आणी महापालिकेकड़े सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या भागात भव्य दैनंदिन मार्केट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • नागरिकांना निवडणुकी दरम्यान २०१५ साली दिलेले वचन आज पूर्ण झाल्याचा आम्हाला आनंद आहे, तसेच सदर मार्केट भव्य स्वरूपाचे असेल व त्या ठिकाणी ६९ ओटले, भाजी व मच्छी मार्केट, सार्वजनिक शौचालय, वाहन पार्किंग सुविधा देखील उपलब्ध असणार आहे अशी माहिती दशरथ भगत यांनी दिली.
  • दरम्यान, काही व्यक्ती मार्केट अंतर्गत ओटले आम्ही मिळवुन देवु म्हणून  पैसे जमा करत असल्याती चर्चा आहे. मात्र  नागरिकांनी अशा भूलथापांना बळू पडू नये असे आवाहन दशरथ भगत आणि निशांत भगत यांनी केले आहे.

===============================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • सानपाड्यात महापालिकेच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्ता धुतला