- कामगार विभागाचे तिसरे विशेष नोंदणी अभियान
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 16 नोव्हेंबर २०१८:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या विशेष नोंदणी अभियानतही जास्तीत जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी कामगार विभागाने राबविलेल्या दोन विशेष नोंदणी अभियानात साडे तीन लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे.
- पहिल्या टप्प्यातील नोंदणी अभियानात 2 लाख 24 हजार 577 बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली होती.
- दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी अभियानात 1 लाख 43 हजार 274 बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली होती.
- पहिला व दुसरा टप्पा एकूण 40 दिवसांचा होता.
कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या तिसऱ्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा शुभारंभ येत्या सोमवारी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत सहयाद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 28 योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. तिसरे विशेष नोंदणी अभियान औरंगाबाद, सातारा, सांगली, नांदेड, लातूर, भंडारा, अकोला, जळगाव, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, वर्धा, गडचिरोली, बुलडाणा अशा 17 जिल्हयात राबविण्यात येणार आहे.
======================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- वाहतुकीला अडथळा ठरणारे सीबीडी सर्कल हटविणार