अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 21 सप्टेंबर 2018:
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील 35 जिल्हयांमध्ये “कुष्ठरोग शोध अभियान-2018” राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका परिसरात 24 सप्टेंबर ते 09 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या मोहिम कालावधीत 110 समुहांमार्फत साधारणत: 37995 घरांमधील व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोग रूग्णांना शोधून त्यांना औषधोपचार देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नविन सांसर्गिक कुष्ठरोग रूग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत करून रोगाचा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे आहे. त्यानुसार विशेषत्वाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दुर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्र, बांधकाम कार्यक्षेत्र, कुष्ठरोगाचे रूग्ण रहिवाशी असलेले कार्यक्षेत्र अशा ठिकाणी सदर अभियान राबविण्यात येणार आहे.
या शोध मोहिमेअंतर्गत घरी येणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना सर्वेक्षण करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिरेतर्फे करण्यात आले आहे.
=========================================================================================================================
इतर बातम्यांचा मागोवा
नेरूळ- खारकोपर रेल्वेमार्ग ऑक्टोबरमध्ये सुरू होणार