अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 21 सप्टेंबर 2018:
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 23 विसर्जन स्थळांवर सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून सातव्या विसर्जन दिवशी 3034 घरगुती व 175 सार्वजनिक अशा 175 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.
- बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 303 घरगुती व 11 सार्वजनिक, नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 379 घरगुती व 34 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसरजन करण्यात आले.
- वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 172 घरगुती व 13 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 398 घरगुती व 18 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसरजन करण्यात आले.
- कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 511 घरगुती व 29 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसरजन करण्यात आले.
- घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 803 घरगुती व 51 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसरजन करण्यात आले.
- ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 191 घरगुती व 15 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसरजन करण्यात आले.
- दिघा विभागात एका विसर्जनस्थळी 277 घरगुती व 04 सार्वजनिक गणेशमुर्तींचे विसरजन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व 23 विसर्जन स्थळांठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त शहर रविंद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उप आयुक्त अंबरिश पटनिगिरे यांच्यामार्फत आपापल्या परिमंडळ क्षेत्रात आठही सहाय्यक आयुक्त – विभाग अधिकारी यांच्या सहयोगाने सुयोग्य व्यवस्था ठेवण्यात आली होती. सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग दक्षतेने कार्यरत होता.
विसर्जनाकरीता तराफ्यांची तसेच आवश्यक त्या ठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेसाठी अग्निशमन दल तसेच आरोग्य पथक उपस्थित होते. आवश्यक त्या स्थळांवर बांबुचे बॅरेकेटींग करण्यात येऊन पुरेशा विद्युतव्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. भक्तजनांना व्यवस्थितरित्या आरती व पूजन करता यावे याकरीता टेबलची सुयोग्य मांडणी करण्यात येऊन पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशात वेगळे ठेवावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक असे सुके निर्माल्य असलेल्या वस्तू स्वतंत्रपणे ठेवाव्यात व कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य व वस्तू पाण्यात टाकू नयेत असे त्याठिकाणी कार्यरत स्वयंसेवकांमार्फत भाविकांना सूचित करण्यात येत होते व त्यानुसार ओले व सुके निर्माल्य वेगवेगळे ठेवले जात होते. याशिवाय श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू वेगळी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांचे वितरण गरजू मुले व व्यक्तींना करण्यात येत आहे. निर्माल्याच्या वाहतुकीसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन त्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्र जागेत प्रक्रिया केली जात आहे.
========================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- नेरुळ-खारकोपर रेल्वे मार्ग ऑक्टोबरमध्ये सुरु- सिडको एमडी