ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे, 8 सप्टेंबर 2018:

ठाणे महानगरपालिकेच्या घोड़बंदर रोड़ला जाणा-या 1158 मीमी व्यासाच्या शुद्ध जलवाहिनीवर जलमापक बसविण्याचे तसेच सदर जलवाहिन्यांवर होत असलेली पाण्याची गळती बंद करण्याचे काम करण्यात येणार  आहे. या कामासासाठी उद्या 9 सप्टेंबर रोजी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • सकाळी 11वाजल्यापासून ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत (24 तास) घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, आझादनगर, ड़ोगरीपाड़ा, वाघबीळ, ओवळा इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

  • या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. 

===============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

 

  • तालवाद्यांचा जादुगर- करण रामदास पाटील