सम्यक विद्यार्थी आंदोलनाला साथ द्या

  • प्रकाश डबरासे यांचे आवाहन

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 6 सप्टेंबर 2018 :

प्रस्तावित उच्च शिक्षण आयोग विधेयक २०१८ चा विरोध करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाला साथ द्या असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश डबरासे यांनी केले.

महेश भारतीय यांचा “विद्यापीठ अनुदान आयोग” वाचवण्यासाठी संपादित केलेला “DENGEROUS_CURVE” – (UGC, The Emporor to Higher Education Commission, The empotent) या ग्रंथाचे प्रकाशन परेल येथे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि भाष्य प्रकाशन यांनी हा ग्रंश संपादित केला आहे. त्यावेळी डबरासे यांनी हे आवाहन केले. सुनील सरदार, प्राचार्य डॉ. वाय. के. ठोंबरे, दिलीप जगताप आदी  मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून, उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याची टीका प्रकाश डबरासे यांनी केली. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे औरंगाबाद,अकोला,बुलढाणा,मुंबई,ठाणे आदी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

======================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा 

  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर यांचे सफाई कामगरांच्या प्रश्नांवर व्याख्यान