आरोग्य विभागाच्या भरतीत ठोक मानधनवावरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या

  • इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
  • नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना निवेदन दिले.

अविरत वाटचाल न्यूज 

नवी मुंबई, 5 सप्टेंबर 2018:

नवी मुंबई महापालिकेच्या नोकरभरतीमध्ये आरोग्य विभागात ठोक मानधनावर काम करणा-या ए.एन.एम. संवर्गातील कर्मचा-यांचा समावेश करावा अशी मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे. या निवेदनाची प्रत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे आज दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठोक मानधनावर एन.एन.एम. या संवर्गातील महिला कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. नियमीत लसीकरण, पल्स पोलिओ मोहिम, प्रसूतीपूर्व नोंदणी, प्रसूतीचिकित्सा सेवा, महापालिकेचे टायफॉइड लसीकरण यांसारख्या मोहिमांमध्ये या महिलांचा मोलाचा सहभाग असतो. सरकारी आरोग्य सेवा सुविधांचा डोलारा हे कर्मचारी यशस्वीपणे पेलतात. मात्र किरकोळ सुट्ट्यांव्यतिरिक्त इतर रजांचा लाभ या महिलांना मिळत नाही,अशी खंत रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.

  • नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नोकरभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.  ए.एन.एम. संवर्ग समाविष्ठ आहे. महापालिकेत गेली अनेक वर्षे कार्यरत असणऱ्या कित्येक कर्मचाऱ्यांची वयाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आता या भरतीकरिता वर्षानुवर्षे ठोक वेतनावर काम करणाऱ्या कामगारांचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना केली आहे.

 

  • दरम्यान, कष्टकरी कामगारांना न्याय मिळावा अशी आपली इच्छा असून सध्या कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास संघटनेमार्फत उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रवींद्र सावंत यांनी दिली आहे.

==========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नेरुळ-खारकोपर रेल्वे मार्ग ऑक्टोबरपासून – सिडको एमडी