अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 4 सप्टेंबर 2018:
सिडको महामंडळ नेहमीच लोकाभिमुख कामांना प्राधान्य देत आले आहे. हाच वारसा आपण पुढे चालवणार आहोत व नवी मुंबईतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर लवकरात तोडगा काढण्यास आपण नेहमीच प्रयत्नशील राहू व नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर देऊ असे प्रतिपादन सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी आज केले. सिडको भवन येथे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
- यावेळी रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार मंदा म्हात्रे, आमदार सुभाष भोईर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमल, पनवेल नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, समाजसेवक महेंद्र घरत व भा.ज.प. चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते.
- सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल व सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन ठाकूर यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे ,सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा देखील उपस्थित होते.
==============================================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- शिवसह्याद्री सोसायटीचा लीज डीडचा तिढा सुटला