- महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल
अविरत वाटचाल न्यूज
ठाणे, 21 ऑगस्ट 2018:
गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला असून विघ्नहर्त्याचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांवरून व्हावे यासाठी श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जनच्या मार्गावरील खड्डे कोणत्याही परिस्थितीत 10 सप्टेंबरपर्यंत भरा, असे सक्त आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरातील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट करून जयस्वाल यांनी खड्डे भरण्याची मोहिम युध्द पातळीवर राबविण्यात यावी असे सक्त आदेश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या मार्गिका नकाशाची महापालिका आयुक्तांनी पाहणी करून त्यानुसार खड्डे भरण्याची मोहिम हाती घेण्याच्या सूचना दिल्या.
24 तासांत मंडपाची परवानगी मिळणार
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करतानाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर 24 तासांत परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी. मात्र हे करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही जयस्वाल यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
=================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- घोट नदीत कार कोसळल्यानंतरचा थरार