चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र तिरुवनंतपुरममध्ये उभारणार

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2018: 

गेल्या काही दिवसात केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर चक्रीवादळे आणि प्रतिकूल हवामानाचा तडाखा बसत असल्याच्या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळाचा इशारा देणारे केंद्र तिरुवनंतपूरम्‌मध्ये उभारण्याचा केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. एका महिन्यात हे केंद्र उभारण्याचा मंत्रालयाचा विचार आहे.

  • चक्रीवादळाचा इशारा देणारी केंद्र सध्या चेन्नई, विशाखापट्टणम्, भुवनेश्वर, कोलकाता, अहमदाबाद आणि मुंबईत आहे.
  • तिरुवनंतपूरमधले केंद्र हवामानाचा इशारा आणि मच्छिमारांसाठी किनारपट्टी बुलेटिन काढण्यासाठी हवामानविषयक सर्व साधनांसह सर्व पायाभूत सोयींनी युक्त असेल.

============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड