वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक मसुदा

  • नागरिकांकडून सूचना मागवल्या

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2018

नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी माहिती संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्याबाबत सामान्य नागरिकांकडून 10 सप्टेंबरपर्यंत सूचना-प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीने आपला अहवाल सादर केला असून वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार केला आहे.

हा मसुदा http://meity.gov.in/data-protection-framework या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मसुद्याबाबत सूचना-प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. या सूचना- प्रतिक्रीया Meity.gov.in या मंत्रालयाच्या पोर्टलवर प्रतिक्रिया पाठवता येणार आहेत.

=============================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा

हरभऱ्याच्या पानांची चुलीवरची गावरान भाजी