टपाल खात्यातर्फे 18 सप्टेंबरला देशव्यापी पेंशन अदालत

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 9 ऑगस्ट 2018:

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतन कल्याण विभागाच्या आदेशानुसार टपाल विभागातर्फे येत्या 18 सप्टेंबर रोजी देशव्यापी पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई जीपीओ येथे सकाळी 11 वाजता ही पेन्शन अदालत होणार आहे.

  • निवृत्तीवेतन धारक आपली तक्रार वरिष्ठ लेखा अधिकारी, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, दुसरा मजला, मुंबई जीपीओ, मुंबई- 400001 या पत्त्यावर 15 ऑगस्टपर्यंत पाठवू शकतात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये अंतर्भाव केला जाणार नाही, असे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • तालवाद्यांचा जादुगर