नवी मुंबईच्या पाण्याची चिंता मिटली

  • मोरबे धरण ओसंडून वाहू लागले
  • नवी मुंबई महापालिकेतर्फे जलपूजन

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 3 ऑगस्ट 2018:

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण पूर्ण भरल्यामुळे आज महापालिकेच्यावतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जलपूजनाप्रमाणेच यावेळी मोरबे धरण परिसरात प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या शुभहस्ते 100 हून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्यवृक्ष ताम्हण, आंबा, जांभूळ, फणस, काजू, सिताफळ, रामफळ, आवळा, जाम अशा पाच ते सहा फूट उंच वृक्षरोपांचा समावेश आहे. या परिसरात 4 हजार वृक्षरोपांची उद्यान विभागामार्फत लागवड करण्यात येत आहे.

समाधानकारक पाऊस पडल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा तसेच प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण भरला आहे.  88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 2309.80 मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत 189.072 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबईची पाण्याची चिंता मिटली आहे.

  • यावेळी महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त  रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर, ड प्रभाग समिती अध्यक्ष मुद्रीका गवळी, इ प्रभाग समिती अध्यक्ष लता मढवी, फ प्रभाग समिती अध्यक्ष अनिता मानवतकर, जी प्रभाग समिती अध्यक्ष नंदा काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्षप्रतोद व्दारकानाथ भोईर, नगरसेवक नामदेव भगत, विनोद म्हात्रे, अनंत सुतार, सुरज पाटील, अशोक गुरखे, गणेश म्हात्रे, लिलाधर नाईक, रामदास पवळे, घनश्याम मढवी, गिरिश म्हात्रे, सुनिल पाटील, रमेश डोळे, हेमांगी सोनवणे, उषा भोईर, ॲड. भारती पाटील, रंजना सोनवणे, संगिता बो-हाडे, सरोज पाटील, तनुजा मढवी, राधा कुलकर्णी, संगिता वास्के, संगिता म्हात्रे, शशिकला सुतार, सुरेखा नरबागे, शिल्पा कांबळी, छाया म्हात्रे, सुजाता पाटील, पुजा मेढकर आदी नगरसेवक, नगरसेविका, परिवहन सदस्य प्रदिप गवस, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, उपआयुक्त नितिन काळे, मुख्य लेखा परिक्षक दयानंद निमकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 

==========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड