कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार

  • पहिल्या स्थानकाचे उद्घाटन 2019 ला होणार

अविरत वाटचाल न्यूज

1 ऑगस्ट 2018,नवी दिल्ली

कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली  मंगळवारी नवी दिल्लीत कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मार्गावर10 नवीन स्थानके उभारली जाणार आहेत त्यापैकी पहिल्या स्थानकाचे उद्‌घाटन जानेवारी 2019 मध्ये होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलमार्फत 40 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून महा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. 2022 सालापर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावर कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर या प्रकल्पालाही त्याचा लाभ होणार आहे.103 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वेबरोबरच या क्षेत्राच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल असे सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले.

 

  • कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च भारतीय रेल्वे करणार असून उर्वरित 50 टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे. 

 

===============================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा -शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड