रस्ते कोणाच्याही मालकीचे असोत; तत्काळ भरा

  • ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे बांधकाम विभागाला आदेश

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे,16 जुलै 2018 :

ठाणे शहरातील जाणारे रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत हे तपासत न बसता अपघात टाळण्यासाठी त्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकाम विभागास दिले.

  • गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस पडत असून त्यामुळे शहरात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा आढावा घेण्यासाठी जयस्वाल यांनी आज तातडीने सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी संततधार पाऊस पडत असल्याने सिमेंटने किंवा डांबरचा वापर करून खड्डा भरता येणे शक्य नसले तरी पर्याय म्हणून पेवर ब्लॉकने खड्डे भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले.
  • रस्ते कोणाचेही असोत
  • दरम्यान खड्डे भरताना रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत, एमएमआरडीएचे आहेत की रस्ते विकास महामंडळाचे आहेत हे तपासता ते रस्ते तात्काळ भरण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश जयस्वाल यांनी सर्व अभियंत्यांना दिले. सर्व अभियंत्यांनी आपापल्या प्रभागात फिरून खड्ड्यांची स्थिती तपासून बांधकाम साहित्य वापरून किंवा पेव्हर ब्लॉक वापरून खड्डे भरण्यात यावे अशा सूचना त्यांनी सर्व अधिका-यांना दिल्या.

===================================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • घोट नदीत कार कोसळल्यानंतरचा थरार