अविरत वाटचाल न्यूज
मुंबई,14 जुलै 2018:
रेल्वे मार्ग तसेच इतर तांत्रिक देखभालीसाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर 15 जुलै रोजीच्या रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
विद्याविहार-भायखळा अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या काळात
- सकाळी 10.58 ते दुपारी 4.24 या काळात घाटकोपरवरून सुटणाऱ्या सर्व अप स्लो मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि भायखळा स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावर चालविल्या जातील. या गाड्यांना कुर्ला, सायन,माटुंगा, दादर, परळ (डबल हॉल्ट) स्थानकांवर थांबतील त्यानंतर भायखळा स्थानकापासून पुन्हा अप स्लो मार्गावर गाड्या वळविण्यात येतील.
- अप स्लो मार्गावरील गाड्या विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकांवर थांबवण्यात येणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना घाटकोपर, कुर्ला, परळ तसेच भायखळा स्थानकातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- सकाळी 10.16 ते दुपारी 2.54 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट, सेमी फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 11.4 ते दुपारी 3.6 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट, सेमी फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 11 ते सायंकाळी 6 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
- मेगाब्लॉकच्या काळात अप मेल, एक्सप्रेस गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक
- सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 या काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर,वाशीसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या गाड्या बंद राहतील.
- मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते कुर्ला , वाशी, पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.
- मेगाब्लॉकमुळे हार्बरमार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 या काळात ट्रान्सहार्बर, मेन लाइनवरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
=======================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- हातमागावरील उत्पादनांना नवसंजीवनी