445 पुलांबाबत मध्य,पश्चिम रेल्वे,मुंबई महापालिकेची चर्चा 

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 5 जुलै 2018:

अंधेरी येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांची मुंबई मनपा आयुक्‍तांसोबत आज बैठक झाली.  या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  डी के शर्मा,  पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक  ए के गुप्ता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत चर्चा झालेले महत्त्वाचे मुद्दे

  •  मध्य व पश्चिम रेल्वे यांचा हद्दी मध्ये आरओबी, एफओबी, स्कायवाक इत्यादी प्रकारचे 445 पूल आहेत या पुलांची संरचनात्‍मक तपासणी उद्या पासुन सुरू करण्‍यात येत आहे.  यासाठी एकूण 10 चमू गठीत करण्‍यात आले आहे.  या चमू मध्‍ये भारतीय प्रद्योगिक (IIT/Mumbai) येथील तज्ञ, संबंधीत रेल्‍वेचे वरिष्‍ठ अभियंता व महापालिकेच्‍याही तज्ञ अभियंत्याचाही समावेश आहे. 

 

  • पुलांची संरचनात्‍मक तपासणी करताना लोकमान्‍य टिळक पुल, एलिफिस्‍टन पुल इत्‍यादी जे सर्वात जूने पुल आहेत, त्‍यांची संरचनात्‍मक तपासणी अगोदर करण्‍यात येणार आहे.

 

  • मध्‍य, पश्चिम रेल्‍वे व महापालिका यांच्‍या मध्‍ये अधिक चांगले समनवयन नियमितपणे साधले जावे या उद्देशाने आता यापुढे दर महिन्‍याला ठराविक दिवशी नियमितपणे बैठक घेतली जाणार आहे.  या बैठकीला रेल्‍वेचे तसेच महापालिकेचे वरिष्‍ठ अभियंता उपस्थित राहतील­.  रेल्‍वे आणि महापालिकेच्‍या यंत्रणांमध्‍ये प्रभावी समनवयन साधान्‍याच्‍या दृष्टिने सदर अभियंते यथोचित कार्यवाही करतील.

=========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा…

  • हरभऱ्याच्या पानांची चुलीवरची भाजी

;