गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 132 विशेष गाड्या

  • 30 जूनपासून तिकिट विक्रीस सुरुवात होणार

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 28 जून 2018:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या दिमतीला मध्य रेल्वेने यंदा पहिल्या टप्प्यात 132 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  गणेशोत्सवासाठी या विशेष गाड्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पुणे येथून  सोडण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांच्या तिकिट विक्रीला 30 जूनपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे.

1) छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – सावंतवाडी रोड (आठवड्यात 6 दिवस) विशेष  (44 फेऱ्या)

  1. 01001 विशेष गाडी 5 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबर या काळात (गुरुवार वगळून) सीएसएमटीवरून मध्यरात्री 12.20 ला निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.10 वाजता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. 01002 विशेष गाडी 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात (गुरुवार वगळून) दुपारी 3 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.40 वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड संगमेश्व:र रोड, रत्नाकगिरी, अडावली, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झराप या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

डब्यांची रचना

  •  या विशेष गाड्यांना 2 एसी थ्री टायर, 10 स्लीपर, 6 जनरल सेकंड क्लासचे डबे  जोडण्यात येणार आहेत.

 

2) छत्रपति शिवाजी टर्मिनस महाराज मुंबई – सावंतवाडी रोड साप्तानहिक विशेष  (8 फेऱ्या)

  1. 01007 विशेष गाडी 6 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काळात केवळ गुरुवारी मध्यरात्री 12.20 ला सीएसएमटीहून सुटून त्याच दिवशी दुपारी 2.10 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. 01008 विशेष गाडी 6 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर याकाळात केवळ गुरुवारी दुपारी 3 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.40 वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.

गाडीच थांबे

  •  या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर(फक्ता 01008 साठी), खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड(फक्त 01008 साठी), संगमेश्व र रोड, रत्ना गिरी, अडावली(फक्त 01008 साठी), विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड(फक्त‍ 01008 साठी), कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 2 एसी थ्री टायर, 10 स्लीपर, 6 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.

======================================================================================================================

  • स्पंदना- महिला लघुुद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ

======================================================================================================================

3) छत्रपति शिवाजी टर्मिनस महाराज मुंबई –रत्नागिरी – पनवेल दैनिक विशेष  (22फेऱ्या)

  1. 01033 विशेष गाडी 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात सीएसएमटीवरून सकाळी 11.30 ला सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
  2. 01034 विशेष गाडी 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात रात्री 10.50 ला रत्नागिरी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 ला पनवेल येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • क्रमांक 01033 ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळून, सावरडे, अरावली रोड आणि संगमेश्वठर रोड  येथे थांबविण्यात येईल.
  • क्रमांक 01034 ही विशेष गाडी संगमेश्वीर रोड, अरावली रोड, सावरडे, चिपळूण, खेड, वीर, माणगांव आणि रोहा या स्थानकांवर थांबविण्यात येईल.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 2 एसी थ्री टायर, 10 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येतील.

 

4) पनवेल-सावंतवाडी रोड-छत्रपति शिवाजी टर्मिनस महाराज मुंबई दैनिक विशेष  (22फेऱ्या)

  1. 01035 विशेष गाड़ी 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात पनवेल येथून सकाळी 7.50 ला सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. 01036 विशेष गाडी 7 स्पटेबर ते 17 सप्टेंबर या काळात सावंतवाडी रोड येथून रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • क्रमांक 01035 ही विशेष गाडी  रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबविण्यात येईल.
  • क्रमांक 01036 ही विशेष गाडी झारप, कुडाळ, सिंधुदुर्ग रोड, कणकवली, नांदगांव रोड, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावरडे, चिपळूण, खेड, वीर, माणगांव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या स्थानकांत थांबविण्यात येईल.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 2 एसी थ्री टायर, 10 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येतील.

=====================================================================================================================

  • आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उलवे टेकडीचे सपाटीकरण

======================================================================================================================

5) लोकमान्य  टिळक टर्मिनस-रत्ना्गिरी-लोकमान्यश तिलक टर्मिनस साप्ता हिक (डबल डेकर) वातानुकूलित विशेष (06 फेऱ्या)

  1. 01187 विशेष गाडी  4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी पहाटे 5.33 ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.30 ला रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
  2. 01188 विशेष गाडी 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी दुपारी 4.20 ला रत्नागिरीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.30 ला लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड आणि संगमेश्व:र रोड या स्थानकांमध्ये थांबविण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या वशेष गाड्यांना 6 एसी डबल डेकर सीटींगचे डबे  जोडण्यात येणार आहेत.

 

6) लोकमान्य  तिलक टर्मिनस-पेडणे साप्ताहिक विशेष (8 फेऱ्या)

  1. 01037 विशेष गाडी 7 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून मध्यरात्री 1.10 ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.30 ला पेडणे रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. 01037 विशेष गाडी 7 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी दुपारी 3.30 ला पेडणेहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना  ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे, संगमेश्वपर रोड, रत्नाकगिरी, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ, झरप,  सावंतवाडी रोड आणि मदुरे या स्थानकात थांबे देण्यात येणार आहत.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना एसी टू टायर, एसी 3 टायर, 13 स्लीपर  आणि 8 सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

======================================================================================================================

  • न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड

======================================================================================================================

7) लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप साप्ताहिक विशेष (8 फेऱ्या)

  1. 01039 विशेष गाडी 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या काळात प्रत्येक सोमवारी मध्यरात्री 1.10 ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.45 ला झाराप येथे पोहोचेल.
  2. 01039 विशेष गाडी 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या काळात प्रत्येक सोमवारी झारापहून दुपारी 3.30 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष साप्ताहिक गाड्यांना  ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे, संगमेश्व र रोड, रत्नाकगिरी, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या विशेष साप्ताहिक गाड्यांना 1 टू टायर एसी, 2 थ्री टायर एसी, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येतील.

 

8) पुणे-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (2 फेऱ्या)

  1. 01431 विशेष गाडी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.45 ला पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. 01432 विशेष गाडी 13 सप्टेंबर  रोजी सकाळी 10 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.35 ला पुण्याला पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना  लोनावळा, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 4 एसी थ्री टायर, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येतील.

======================================================================================================================

  • हातमागावरील साड्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

======================================================================================================================

9) पुणे-सावंतवाडी रोड-पनवेल विशेष (4 फेऱ्या)

  1. 01447 विशेष गाडी 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या काळात पुण्याहून सायंकाळी 6.45 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. 01448 विशेष गाडी 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात सकाळी 10 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.15 ला पनवेल येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • गाडी क्रमांक 01447 ला लोनावळा, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 01448 ला झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगांव आणि रोहा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 4 एसी थ्री टायर, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडले जातील.

 

10) पनवेल-सावंतवाडी रोड साप्ता हिक विशेष (2)

  1. 01433 विशेष गाडी 11 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 ला सावंतवाडी रोड  येथे पोहोचेल.
  2. 01434 विशेष गाडी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.15 ला पनवेल स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे(फक्त 01433 साठी), संगमेश्वर रोड(फक्त 01433 साठी), रत्नागिरी, राजापुर रोड(फक्त  01433 साठी), कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबे देण्यात येतील.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना  4 एसी थ्री टायर, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येतील.

======================================================================================================================

  • हरभऱ्याच्या पानांची चुलीवरची भाजी

======================================================================================================================

11) पनवेल-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (2 फेऱ्या)

  1. 01435 विशेष गाडी 12 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 ला पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 ला सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  2. 01436 विशेष गाडी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8 .15 ला पनवेल येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे(मात्र 01436 के लिए), संगमेश्व र रोड,  रत्नातगिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप  या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 4 एसी थ्री टायर, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

12) पनवेल-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक विशेष (4 फेऱ्या)

  1. 01449 विशेष गाडी 8  आणि 15 सप्टेंबर रोजी रात्री 10.45 ला पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 ला रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
  2. 01450 विशेष गाडी 9 आणि 16 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरी येथून सुटेल आमि त्याच दिवशी रात्री 11.35 ला पुणे येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • गाडी क्रमांक 01449ला रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
  • गाडी क्रमांक 01450 ला संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावरडे, चिपळूण, खेड, माणगांव, रोहा, पनवेल आणि लोनावळा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 4 एसी थ्री टायर, 8 स्लीपर आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

 

गाड्यांचे तिकिट 30 जूनपासून

गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या या विशेष गाड्यांच्या तिकिटांचे अारक्षण विशेष शुल्कासह सर्व पीआरएस केंद्र आणि वेबसाइट www.irctc.co.in वर 30 जूनपासून सुरु होणार आहेत.

या गाड्यांचे जनरल डबे  अनारक्षित स्वरुपात चालविण्यात येणार आहेत.