अविरत वाटचाल न्यूज
25 जून 2018:
मंत्रालयात मे 2018 पर्यंत झालेल्या 107 लोकशाही दिनांमधील एकही अर्ज प्रलंबित नसून 1 हजार 470 तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 108 वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी 11 तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी सुनावणी केली.
- प्रतेयक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केला जातो. आतापर्यंत एकूण 107 लोकशाही दिन झाले आहेत. त्यामध्ये 1 हजार 470 तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व तक्रारी वेळीच निकाली काढल्याने मे 2018 अखेरपर्यंत प्रलंबित अर्जांची संख्या शून्य झाली आहे.
- आज झालेल्या लोकशाही दिनात सातारा, वसई, कांदिवली, पुणे, ठाणे, जळगाव, बुलढाणा, वेंगुर्ला येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मांडली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
=========================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा…
- न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड