- सिडको एमडींचा अधिकाऱ्यांना आदेश
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 25 जून 2018:
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या निर्देशानुसार सिडकोचे विभागप्रमुख दर सोमवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत नागरिकांना भेटणार आहेत. नागरिकांनी कोणतीही वेळ न घेता राखून ठेवलेल्या वेळेत थेट अधिकाऱ्यांना भेटून त्यांची गाऱ्हाणी मांडू शकणार आहेत.
- नागरीकांच्या समस्यांवर समोरासमोर चर्चा होऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा निघून त्यांची कामे वेळेवर मार्गी लागावीत यासाठी सिडकोतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दर सोमवारी नागरिक कोणतीही पूर्व वेळ – पूर्व परवानगी न घेता त्यांच्या कामाशी संबंधित विभाग प्रमुखास थेट भेटू शकतात. यातून नागरीकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार आहे.
- संपूर्ण आठवड्यातील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत दुपारी 2 ते 4 वेळेत नागरिक त्यांच्या कामाशी संबंधित विभाग प्रमुखांना नेहमीप्रमाणे भेटू शकतात. परंतु दर सोमवारी दुपारी 2 ते 3 ही वेळ केवळ अभ्यागतांना भेटण्यासाठी राखीव ठेवण्यात आली असल्याने नागरीकांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
=====================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- हरबऱ्याच्या पानांची चुलीवरची भाजी