17 जूनच्या मेगाब्लॉकमुळे हार्बरचे वेळापत्रक बदलले

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 16 जून 2018:

रेल्वे मार्गाच्या देखभालीसाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर 17 जून रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

  • सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे, डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात
  • चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात
  1. सीएसएमटी वरून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 या काळात वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर गाड्या बंद राहणार आहेत. तसेच वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीसाठी सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 या काळात गाड्या बंद राहणार आहेत.
  2. पनवेल,बेलापूर,वाशीहून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या काळात सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या सर्व अप हार्बर गाड्या बंद राहतील. वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 या काळात सीएसएमटीला सुटणाऱ्या गाड्या बंद राहतील.
  3. हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरून विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  4. मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात मेन लाईन तसेच पश्चिम रेल्वेने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

 

============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदनाः महिला लघउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ