उद्यापासून एसटीच्या तिकिटांचे दर असे असणार

  • तिकीट दरात 18 टक्के वाढ

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 15 :

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात उदया 16 जूनपासून (15 जूनच्या मध्यरात्रीपासून) 18 टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे.

  • डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे.

 

  • तिकीटाची भाडे आकारणी ही 5 रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट 7 रुपये असेल तर त्याऐवजी 5 रुपये आकारले जातील. 8 रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे.

 

एसटी महामंडळाकडून प्राप्त नवीन आणि जून्या तिकिट दराचा तक्ता

==============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड