ठाण्यात  २५ किमीचा सायकल ट्रॅक

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे, 15 जून 2018:

पर्यावरणाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतर्फे शहरात २५ किमी लांबीचा मॉडेल सायकल ट्रॅक निर्माण करण्यात येत आहे.परिसर सुधार योजनेतंर्गत या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येत आहे. या अंतर्गत ठाणे पूर्व आणि पश्चिमेलगत रस्त्यावर हा सायकल ट्रॅक उभारण्यात येत आहे.

  • यामध्ये वागळे इस्टेटमध्ये रोड नं. १६, १६ झेड, रोड नं. ३३, ३४ या रस्त्यांवर ५ किमी लांबीचा, देवदयानगर, बॅ. नाथ पा रोड ते नीळकंठ वूडस आणि पोखरण रोड नं. १,२,३ या रस्त्यांवर १२ किमी लांबीचा ट्रॅक तर स्टेशन परिसरात १२ ते १३ किमी लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. 
  • सदरचा ट्रॅक साधारणत: तीन ते साडे तीन किमी लांबीचा बनविण्यात येणार आहे. त्यावर सायकलधारकांना एकाचवेळी ये-जा करण्यास शक्य होणार आहे.
  • परिवहन सेवेचे बस निवारे आणि नव्याने उभारण्यात येणारे सायकल स्टॅन्डस् याच्याशी हे सायकल ट्रॅक्स जोडण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

हा सायकल ट्रॅक हा पूर्णपणे सायकलसाठीच वापरण्यात येणार आहे. त्या ट्रॅकवर वाहने पार्किंग होणार नाहीत याची दक्षता घेतानाच पार्किंगसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागास दिल्या.  यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते. 

=================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा – शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड