राज्यात 1500 नवीन ‘होम स्टे टुरीजम’ सुरु करणार

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 8 जून 2018:

राज्यात आता ‘होम स्टे टुरीजम’ला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. यादृष्टीने आंतरराष्ट्रीय कंपनी एअर बीएनबी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘पर्यटन उद्योजकता प्रोत्साहन’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एलिफंटा लेणी परिसरात ३५ ते ४० घरांची निवड करुन तिथे होम स्टे सुविधा सुरु केली जाणार आहे. राज्यात येत्या वर्षात १ हजार ५०० होम स्टे सुविधा सुरु करुन या कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या घरांचे यजमान हेच या योजनेचे लाभार्थी उद्योजक असतील. त्यांना आदरातिथ्य, पाककला, पर्यटन, स्थानिक संस्कृती आदींविषयी प्रशिक्षण दिले जाईल. एअर बीएनबीच्या मानकांनुसार या घरांमध्ये दर्जेदार सुविधा, सुरक्षा आदींची उपलब्धता करुन त्यांना देश – विदेशातील पर्यटक हे होम स्टे साठी उपलब्ध करुन देण्यात येतील. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि एअर बीएनबीच्या धोरण – संवाद विभागाचे जागतिक प्रमुख क्रिस लेहेन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

कोकणात चालना देणार

  • महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती, शेती परंपरा, कला – साहित्य याचे देश – विदेशातील पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. याचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी पर्यटक हे हॉटेलऐवजी स्थानिक लोकांसमवेत राहणे पसंत करतात. त्यामुळेच होम स्टेची संकल्पना विकसीत झाली असून महाराष्ट्रात एमटीडीसी आणि एअर बीएनबी यांच्या एकत्रीत सहभागातून त्याला चालना देण्यात येईल. जवळपास ९० टक्के इतका पर्यटन उद्योग हा आता ऑनलाईन स्थलांतरित झाला आहे. पर्यटक आता कोठेही फिरण्यास जाण्यापूर्वी सर्व प्रकारच्या सुविधांची ऑनलाईन बुकींग करतात. त्यामुळेच आता होम स्टेसारखी सुविधा देऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण पर्यटन व्यावसायिकांनाही ऑनलाईन आणणे गरजेचे आहे. एअर बीएनबी समवेतची भागिदारी यादृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरेल. या भागीदारीतून प्राथमिक टप्प्यात कोकण किनारपट्टीत होम स्टे व्यवसायाला चालना दिली जाईल. टप्प्याटप्प्याने राज्याच्या संपूर्ण भागात होम स्टे व्यवसाय विकसीत केला जाईल, असे रावल यांनी सांगितले.

इतर बातम्यांचाही मागोवा…

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द
https://goo.gl/hooimC

 

राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका
https://goo.gl/8u13dB

 

15 जूनपासून एसटीचा प्रवास महागणार
https://goo.gl/7xigrU