जुईनगर येथे रेल्वे वसाहतीत नागरी कामे सुरू

नवी मुंबई, 26 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

जुईनगर रेल्वे वसाहतीमधील विकासकामांचा शुभारंभ खा. राजन विचारे, खा. राजन विचारे, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ भगत व युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत भगत  यांच्याहस्ते करण्यात आले. 25 डिसेंबर रोजी वसाहमधीलमधील विकास कामांना सुरुवात करण्यात आली.

जुईनगर रेल्वे कॉलोनी हे १९९८ साली बांधण्यात आली. परंतु सदर इमारतीचे बांधकाम निक्रुष्ट दर्जाचे झालं असल्यामुळं सर्व कामगार व त्यांच्या परिवारास अनेक समस्याना सामोरं जावं लागायचं, वसाहतीतील रहिवाशी मूळभूत नागरीसुविधा पासून वंचित होते, स्लॅब कोसळणं, सांडपाण्याचं शून्य नियोजन,  संरक्षण भिंत, चिखलानं भरलेले रस्ते, विद्युत दिव्यांची व्यवस्था नाही, धोकादायक इमारती असे अनेक समस्या आहेत.
या समस्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेविका रुपाली भगत, युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या समवेत वसाहतीच्या शिष्टमंडळानं रेल्वे अधिकारी अमिताभ ओझा आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत रेल्वे वसाहतीतील नागरिकांच्या समस्यांविषयी चर्चा केली. यामध्ये धोकादायक इमारतींचं मजबूतीबाबत परिक्षण करणे, इमारतींचं दुरुस्तीकरण, रस्ते, संरक्षण भिंत, उद्यान, आरोग्यकेंद्र, डेब्रिज आदी अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली होती. तसंच त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.

त्यापार्श्वभूमीवर सुमारे 2 कोटी रुपये खर्चून वसाहतीमधील रस्ते, माल:निसारण वाहिन्या, संरक्षण भिंत आणि इमारतींचं नुतनीकरण  करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ 25 डिसेंबर रोजी खा. राजन विचारे, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ भगत व युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत भगत  यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कॉंग्रेस, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते.