पाणी उकळून प्या

  • मुंबई महापालिकेचे आवाहन

अविरत वाटचाल

मुंबई,1 जून  २०१८:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालाड टेकडी जलाशय पाणी टाकीच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा जलाशय 5 जून रोजी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरेगांव (पूर्व) व मालाड (पूर्व) विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ७ दिवस उकळून व गाळून पिण्‍याचे आवाहन बृहन्‍मुंबईने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड टेकडी जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक १ मधील भाग क्रमांक १ च्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा जलाशय ५ जून पासून कार्यान्वित करण्यात येत असल्याने पी/दक्षिण (पूर्व) व पी/उत्तर (पूर्व) म्हणजेच गोरेगांव (पूर्व) व मालाड (पूर्व) विभागातील नागरिकांनी ५ जून पासून पाणी गाळून व उकळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.