यंदा सरासरी 97 टक्के पाऊस

  • हवामान खात्याचा अंदाज

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 30 मे 2018:

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आज तामिळनाडूच्या काही भागापर्यंत पोहोचला आहे. मान्सून पुढे  सरकरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून साधारण 6 ते 8 जून पर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये दाखल होईल. जून ते सप्टेंबर या काळात देशात दीर्घकालीन सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे.

देशभरात जून ते सप्टेंबर 2018 या काळात सर्वसाधारण म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के ते 104 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. यात 4 टक्के कमी-जास्त होण्याचा अंदाज आहे.

वायव्य भारतात 100 टक्के, मध्य भारतात 99 टक्के, दक्षिण भारतात 95 टक्के तर ईशान्य भारतात 93 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 101 टक्के तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 94 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.