पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

  • वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची वाहतूक मध्यरात्रीपासून बंद राहणार
  • कोकण रेल्वे मार्गावरील अनेक  गाडया उशिराने धावणार

अविरत वाटचाल

मुंबई, 26 मे 2018 :

कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान असलेला जूना पादचार पूल पाडण्याचे काम आज रात्री 11.30 ते उद्या पहाटे 5.30 या काळात केले जाणार आहे. त्यामुळे हार्बर आणि मेन लाइनवरील वाहतुकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या कामामुळे मध्य रेल्वेवरील रविवार (27 मे )चा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र पादचारी पूल पाडण्याच्या कामामुळे आज मध्यरात्रीपासून पहाटे 5.30 दरम्यान वडाळा रोड ते मानखूर्ददरम्यानची लोकसेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. 27 मे रोजी  सीएसएमटी- मडगांव मांडवी एक्सप्रेस सकाळी 7.10 च्या ऐवजी सकाळी 9.5 ला सुटणार आहे. 

हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यानचा पादचारी पूल पाडण्याचे काम आज (26 मे) रात्री 11.30 ते उद्या, 27 मे रोजी पहाटे 5.30 या काळात करण्यात येणार आहे.
  • या कामामुळे अप जलद मार्गावर आज रात्री11.30 ते उद्या 27 मे रोजी पहाटे 5.30 पर्यंत, मेन अप आणि डाउन धिम्या, जलद मार्गावर रात्री 1.30 ते पहाटे 3.30 पर्यंत काम करण्यात येणार आहे.
  • या कालावधीत 26/27 मे च्या मध्यरात्री हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकल वाहतूकसेवा बंद राहणार आहे.
  • सीएसएमटी हून पनवेल/बेलापूर/वाशी करिता सुटणा-या डाऊन हार्बर मार्गावरील  लोकल रात्री 10.58 ते रात्री 12.40 पर्यंत आणि 3.51 ते 05.56 पर्यंत रद्द ठेवण्यात येणार आहेत.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी करिता सुटणा-या अप हार्बर मार्गावरील लोकल रात्री 9.59 ते रात्री 12.03 पर्यंत रदद् राहणार आहेत.
  • या  कालावधीत पनवेल आणि मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ठाणे मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

27 मे (रविवार) रोजी रद्द केलेल्या मेल / एक्सप्रेस गाड्या

  1. ट्रेन क्रमांक 11010/11009 पुणे- सीएसएमटी -पुणे सिंहगढ़ एक्सप्रेस
  2. ट्रेन क्रमांक 22102/22101 मनमाड- सीएसएमटी – मनमाड राज्यरानी एक्सप्रेस
  3. ट्रेन क्रमांक 12124/12123 पुणे- सीएसएमटी – पुणे डेक्कन क्विन एक्सप्रेस
  4. ट्रेन क्रमांक 12110/12109 मनमाड – सीएसएमटी – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
  5. ट्रेन क्रमांक 12118/12117 मनमाड –लोकमान्य टिळक टर्मिनस – मनमाड गोदावरी एक्सप्रेस

 

27 मे रोजी दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणा-या आणि सुटणा-या एक्सप्रेस

  1. गाड़ी संख्या 11058 अमृतसर- सीएसएमटी एक्सप्रेस
  2. ट्रेन क्रमांक 51034 सांईनगर शिर्डी – सीएसएमटी फास्ट एक्सप्रेस
  3. ट्रेन क्रमांक 16382 कन्याकुमारी- सीएसएमटी जयंती-जनता एक्सप्रेस
  4. ट्रेन क्रमांक 12810 हावडा- सीएसएमटी मेल
  5. ट्रेन क्रमांक 12106 गोंदिया – सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस

27 मे रोजी (रविवार) गाड्यांच्या बदललेल्या वेळा

  1. ट्रेन क्रमांक 10103सीएसएमटी- मडगांव मांडवी एक्सप्रेस सकाळी 7.10 च्या ऐवजी सकाळी 9.5 ला सुटेल.
  2. ट्रेन क्रमांक 11301 सीएसएमटी – केएसआर बेंगलुरु उदयान एक्सप्रेस सकाळी 8.5 ऐवजी सकाळी 10.10 वाजता सुटेल.

27 मे रोजी  1- 2 तास उशिराने पोहोचणा-या एक्सप्रेस

  1. ट्रेन क्रमांक 11028 चेन्नई सेंट्रल – सीएसएमटी मेल
  2. ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस
  3. ट्रेन क्रमांक 12134 मेंगलौर जं. – सीएसएमटी एक्सप्रेस
  4. ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद – सीएसएमटी हुसैनसागर एक्सप्रेस
  5. ट्रेन क्रमांक 11140 गडक- सीएसएमटी एक्सप्रेस
  6. ट्रेन क्रमांक 11402 नागपुर – सीएसएमटी नंदिग्राम एक्सप्रेस
  7. ट्रेन क्रमांक 10112 मड़गाव – सीएसएमटी कोंकणकन्या एक्सप्रेस
  8. ट्रेन क्रमांक 11022 तिरुनेलवेली – दादर चालुक्य एक्सप्रेस
  9. ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई ऐगमोर – दादर सुपरफास्ट एक्सप्रेस
  10. ट्रेन क्रमांक 12112 अमरावती – सीएसएमटी एक्सप्रेस
  11. ट्रेन क्रमांक 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस
  12. ट्रेन क्रमांक 12116 सोलापुर – मुंबई सिध्देश्वर एक्सप्रेस
  13. ट्रेन क्रमांक 17058 सिकंदराबाद – सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस
  14. ट्रेन क्रमांक 17412 कोल्हापुर – सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
  15. ट्रेन क्रमांक 12138 फिरोजपुर – सीएसएमटी पंजाब मेल
  16. ट्रेन क्रमांक 22144 बीदर – सीएसएमटी एक्सप्रेस
  17. ट्रेन क्रमांक 12290 नागपुर – सीएसएमटी- दुरंतो एक्सप्रेस