अविरत वाटचाल न्यूज
पनवेल, 24 मे 2018:
पनवेल महापालिकेने महानगरपालिका हद्दीत प्लास्टिकविरोधात जोरदार मोहिम सुरू केली आहे. मार्केड यार्डमध्ये महापालिकेने कारवाई केल्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्लास्टीकच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी प्लास्टीकचा वापर टाळावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
- पनवेल महानगरपालिका हद्दीतील मार्केट यार्डामध्ये आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमिर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 24.5 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. तसेच प्लास्टीकचा वापर करणाऱ्या संबंधित दुकानदारांकडून २१ हजार ९५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
आजच्या कारवाईत 9 हजारांचा दंड
- दरम्यान, महापालिका प्रशासनाने आज केलेल्या कारवाईत दोन किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. तसेच 9 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. या वेळी सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे, प्रभाग अधिकारी अनिल जगधनी, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र आंबोलकर, संगिता आंबोलकर आदी उपस्थित होते.