- केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती
अविरत वाटचाल न्यूज
नवी दिल्ली, 24 मे 2018:
पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून बुधवारी सांगण्यात आले आहे. पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या साखर आयातीबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे.
पाकिस्तानातून 1908 मेट्रिक टन साखर आयात
- चालू आर्थिक वर्षात 14 मे 2018 पर्यंत पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आली असून त्याची किंमत 0.657 दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तुलनेने 2017-18 यावर्षात पाकिस्तानातून 13 हजार 110 मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती व त्याची किंमत 4.68 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती.
- भारतात प्रामुख्याने ब्राझीलकडून साखरेची आयात केली जाते. 2017-18 च्या गळीत हंगामात देशात साखरेचे उत्पादन 31.90 मेट्रिक टन झाले. या वर्षभरातच देशातून 1.75 दशलक्ष टन साखरेची निर्यातही झाली. एप्रिल-मे 2018 या दोनच महिन्यात साखरेची एकूण निर्यात 240.093 मेट्रिक टन इतकी होती. म्हणजेच भारतातील साखरेचे एकूण उत्पादन व निर्यात यांच्या तुलनेत पाकिस्तानातून होणारी आयात अत्यल्प असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तान सरकारने त्यांच्या निर्यात साखरेवर प्रती किलो 10.7 रूपयांचे अंशदान (सबसिडी) दिल्याचेही वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
भारतात साखरेची आयात पूर्णपणे मोफत
- सध्या भारतात साखरेवर 100 टक्के सीमा शुल्क असून साखरेची आयात मोफत होते. भारतात आयात होणाऱ्या कोणत्याही मालावर पाकिस्तानबाबत विशिष्ट निर्बंध घालण्यात आले नसल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जागतिक व्यापार संघटनेचा ‘एमएफएन’ करार भारतासह या संघटनेच्या सभासद असलेल्या पाकिस्तान व अन्य देशांवर बंधनकारक आहे.
साखर आयातीवर दृष्टीक्षेप
- साखरेच्या किंमतीच्या दृष्टीने विचार केल्यास आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये भारताने 1019 दशलक्ष अमेरिकन डॉलर किंमतीची साखर आयात केली होती. 2017-18 मध्ये साखर आयातीत 934 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी घट झाली. यंदा एप्रिल-मे 2018 या काळात साखरेची एकूण आयात 37.75दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे.
- देशात 2016-17 मध्ये 2.14 दशलक्ष मेट्रिक टन साखरेची आयात झाली. वर्ष 2017-18 मध्ये त्यात किंचित वाढ होऊन साखर आयातीचे प्रमाण 2.40 दशलक्ष मेट्रिक टन इतके झाले. एप्रिल-मे 2018 दरम्यान एकूण साखर निर्यात 116, 2512 मेट्रिक टन होती.
- ब्राझीलकडून आपल्या देशात बहुतांश साखर आयात केली जाते. प्रागतिक अधिकृत किंवा प्रमाणित पध्दतीनुसार साखरेची आयात देशांतर्गत विक्रीसाठी केली जात नाही तर केवळ निर्यातीसाठीच ही साखर आयात केली जाते. सीमाशुल्क अदा करण्यासाठी आयातदारांना एमईआयएस (भारतातून होणारी व्यापारी निर्यात) पध्दतीचा वापर करणे बंधनकारक आहे. यात सरकारकडून त्यांना निर्यातीच्या किंवा निर्यात रकमेच्या प्रमाणात काही पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या व्यापरमुक्त असल्याने आयातदार त्या अन्य निर्यातदारांकडूनही खरेदी करू शकतात.
देशातून निर्यात झालेली साखर
2016-17 मध्ये भारताने 2.54 दशलक्ष मेट्रिक टन साखरेची निर्यात केली. 2017-18 मध्ये त्यात 1.75 दशलक्ष मेट्रिक टन इतकी घट झाली. 2018-19 या आर्थिक वर्षातील एप्रिल-मे या दोन महिन्यांत साखरेची एकूण निर्यात 240,093 मेट्रिक टन होती.