अविरत वाटचाल
नवी मुंबई, 21 मे 2018
नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम 22 मे रोजी केले जाणार आहे त्यामुळे 22 मे रोजी नवी मुंबई आणि कामोठे क्षेत्रातीलपाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांत दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही,तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे बुधवारी 23 मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.