अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 5 मे 2018
उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसएमटी ते करमाळीदरम्यान आणखी सहा विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 ते 11 मे दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
सीएसएमटी-करमाळी विशेष (2 फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01127 ही विशेष गाडी 9 मे रोजी मध्यरात्री 12.20 ला सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.30 ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01128 ही विशेष गाडी 11 मे रोजी सकाळी 10.20 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 11.15 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 15 स्लीपर आणि 2 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.
पनवेल-करमाळी (2 फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01129 ही विशेष गाडी 9 मे रोजी रात्री 11.40 ला पनवेल स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01130 ही विशेष गाडी 9 मे रोजी दुपारी 2 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या विशेष गाडीला रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 15 स्लीपर डबे आणि 2 सेकंडक्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.
पनवेल-करमाळी विशेष गाड्या (2 फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01129 ही विशेष गाडी 10 मे रोजी रात्री 11.40 ला पनवेल स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01130 ही विशेष गाडी 9 मे रोजी दुपारी 1.40 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.15 ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या विशेष गाडीला रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 15 स्लीपर डबे आणि 2 सेकंडक्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.