अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 24 एप्रिल 2018:
तुर्भे विभागात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या सुमारे 15 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तुर्भे येथील या कारवाईमध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणा-या तुर्भे से.19 येथील श्री. ब्रम्हाणी टेड्रर्स, महाराष्ट्र टेड्रर्स, निकुल ट्रेडींग, न्यु पारस ट्रेडर्स, बिपीन ट्रेडींग, नाखवा ट्रेडर्स तसेच श्री. सुमती ट्रेडींग, बजरंग ट्रेडर्स, शिवम ट्रेडर्स, शुभम ट्रेडींग, बहुचारी ट्रेडर्स, डेली मार्ट, मनीषा ट्रेडींग, भाग्यश्री ट्रेडर्स त्याचप्रमाणे तुर्भे सेक्टर 20 मधील जीत कम्युनिकेशन ॲन्ड जनरल स्टोअर अशा 15 दुकानदारांवर कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रूपये प्रमाणे दंड आकारण्यात आला असून एकूण 75 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. या दुकानांवर महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज) (उत्पादन व वापर) नियम 2006 आणि महाराष्ट्र विघटनशील घनकचरा नियम 2006 अन्वये कारवाई करण्यात येऊन एकूण रक्कम रु. 75 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
- “प्लास्टिकमुक्त नवी मुंबई” हा निर्धार करीत नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर टाळणे व पर्यायी कागदी / कापडी पिशव्यांचा वापर करणे यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे.