हिंदी महासागरात चीनच्या युध्दनौका

  • भारतीय नौसेनेचा युध्दनौकांचा नकाशा जाहीर  

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2018

भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान संबंध नेहमीच ताणलेले राहिले आहेत. त्यातच हिंदी महासागरात चीनच्या तीन युध्दनौका आढळून आल्या आहेत. यावर भारतीय नौसेनेने ट्वीट करत म्हटले आहे की, पीएलए- नौसेनेच्या 29 व्या एन्टी पायरसी एस्कॉर्ट फोर्सचे हिंदी महासागरात स्वागत करत आहोत. हॅपी हंटिंग.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या या युध्दनौका आहेत. हिंदी महासागरात रिसर्च बेस तयार करण्यासाठी या युध्दनौका पाठविण्यात आल्या आहेत असे स्पष्टिकरण चीन तर्फे देण्यात आले आहे.

भारतीय नौसेनेने यावर ट्विट करत म्हटले आहे की आमच्या सागरी सिमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही 24 तास सजग आणि सक्षम आहोत. यासोबतच भारतीय युध्दनौका हिंदी महासागरात कुठे असणार आहेत त्याचा नकाशाही प्रसिध्द केला आहे.