सीमा खंडाळे
प्लास्टिक या एका तीन अक्षरी शब्दाचा शोध लागला आणि त्यापसून बनलेल्या वस्तूंनी आपल्या दैनंदिन जीवनाच कधी प्रवेश केला हे समजलचं नाही. आज प्लास्टिकशिवाय आपल्या दैनंदिन आयुष्यात पानही हलत नाही हे खरं आहे. भाजी बाजारात भाजी खरेदी करतानाही सहजपणे आपण पिशवी मागतो. एका पिशीमुळे काय होणार ही आपली मानसिकता पर्यावरणावर मात्र गंभीर परिणाम करत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करता येणं किंवा या पिशव्या टाळता येणं आपल्याला सहज शक्य आहे. दैनंदिन वापरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी किंबहुना त्याला पर्याय देण्यासाठी अशय संथेच्या सीमा परदेशी खंडाळे यांनी मोहिम सुरू केली. आपल्या घरात जुन्या साड्या असतातच. या साड्यांपासून बनविलेल्या कापडी पिशव्या वापरण्याची. विशेष म्हणजे संस्थेतर्फे या पिशव्या तयार करून लोकांना मोफत देण्यात येतात. सध्या सीमाताई पाच प्रकारच्या विविध आकारातल्या कापडी पिशव्या बनवतात. यामधून पर्यावरणालाही हातभार लागतो आणि जुन्या साड्यांची आठवणही आपल्याकडे कायमची राहते.
एका साडीपासून साधारणतः दहा पिशव्या बनविता येणं सहज शक्य आहे हे लक्षात आल्यावर सीमाताईंनी लोकांना जुन्या साड्या देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला लोकांनीही चांगला प्रतिसाद देत पहिल्याच कार्यक्रमात सत्तर साड्या दिल्या. भुसावळच्या दीपनगर भागातील काही महिलांना सीमाताईंनी या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार आता चार महिला सीमाताईंना या कामात मदत करतात. यामुळे या महिलांच्या रोजगाराचा प्रश्नही एकाअर्थाने सोडवला गेला आहे. एका व्यक्तीने दिवसाला सरासरी चार प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवला तरी वर्षाला सरासरी ३२० प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होऊ शकतो. हे प्रमाण हळूळू वाढावा यासाठी अशय संस्था काम करते. आपणही या कामात सहभागी होऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावू शकतो.
महिलांसाठी नॅपकीनऐवजी मेनस्ट्रअल कपचा पर्याय
याच कामादरम्यान कच-याचामध्ये आढणा-या सॅनिटरी नॅपकीवर सीमाताईंचे लक्ष गेले. प्लास्टिकप्रमाणेच पर्यावरणात विघटन न होणारे हे नॅपकीन असल्याचे लक्षात आले. जसा पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा पर्याय समोर आणला तसाच या नॅपकीनसाठी मेनस्ट्रअल कपचा पर्याय त्यांनी शोधला.
मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी सुरू होते. पाळी येणं हा खरतरं नैसर्गिक क्रम. निसर्गाने सृजनासाठी केलेला हा करिष्मा. पण आपल्याकडे याबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. या काळात योग्य स्वच्छता न राखल्यामुळे होणारे गंभीर आजारही आहेत. पूर्वीच्या काळात मासिक पाळी दरम्यान घरगुती कापडाचा वापर केला जात होता. कापडाऐवजी तयार सॅनटरी पॅड बाजारात दाखल झाले. यामुळे महिलांना या मासिक पाळी दरम्यानच्या धुवा, सुकवा या त्रासापसून मुक्ती मिळाली. अगदी सहज उफलब्ध असणा-या या नॅपकीनसमुळे महिलांना बाहेर पडताना जाणवणारे टेंशन दूर झाले. मात्र आता या नॅपकीच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम समोर येऊ लागला आहे. हे नॅपकीन नष्ट होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. या सॅनटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. वापरलेला मात्र योग्य विल्हेवाट न लावलेला एक नॅपकीन लाखो जंतू निर्माण करतो. यामध्ये वापरले जाणारे प्लास्टिक हेही विघटनशील नसल्यामुळे पुन्हा पर्यावरणातील कचरा तयार होत आहे. अवघ्या काही सेकंदातच या नॅपकीनमुळे लाखो जंतू तयार होतात. शिवाय हे देखील प्लास्टिकपासूनच बनवलेले असतात. त्यामुळे पुन्हा पर्यावरणासाठी घातकच असतात. यांचा वापर कमी व्हावा यासाठी मेनस्ट्रअल कपचा पर्याय पुढे आला. सीमाताईंनी आता कप बाबात जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. पर्समध्ये एका छोट्याश्या बटव्यात हा कप सहज राहतो. त्यामुळे यासाठी खूप जागा लागत नाही. हा कप सिलिकॅन मटेरियलपासून बनवलेला सतो. आपल्या रक्तासोबत त्याची कोणतीही प्रक्रिया होत नाही. तसंच आपल्या शरिरालाही तो त्रासदायक ठरत नाही. साधारण नऊ ते बारा तासांच्या कालावधीपर्यंतही हा कप धुवू शकतो. पाळीचा स्त्राव कमी-जास्त असेल त्याप्रमाणात कप धुऊ शकतो. मुख्य म्हणजे या कपाला दुर्गंधी येत नाही. सिलिकॅन मटेरिय़र हे पर्यावरणालाही घातक ठरत नाही. बाजारात सध्या वेगवेगळ्या आकारात, मापात आणि रंगात हे कप उपलब्ध आहेत.
शरीराच्या अंतर्गत भागात एखादी वस्तू टाकणे याबाबत खरतरं सुरूवातीली भिती वाटणं स्वाभाविक आहे. मात्र आज अनेक महिला हा कप वापरण्याला प्राधान्य देत आहेत. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे यामुळे शरिराला कोणताही त्रास होत नाही. मुख्यत: कोणताही संसर्ग होत नाही. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी सीमाताई आपल्या अशय ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत.
संपर्क
सीमा परदेशी खंडाळे
अशय सोशल ग्रुप
पी,१५,सर्हे ५४- ५५
अरूण कुमार वैद्य नगर, सकरी रोड
धुळे-४२४००१
संपर्क -9930025807
Email : connectashay@gmail.com
Website : www.ashaysocialgroup.org
संकलन – स्वप्ना हरळकर
AV News Bureau