मयत अनोळखी बेवारस इसमाच्या वारस/नातेवाईकांचा शोध

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 13 जानेवारी 2025

पंचामृत बसस्टॉपवर, पंचामृत सोसायटी समोर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) येथे एक अनोळखी इसम (अंदाजे वय 50 ते 55 वर्षे) बेशुध्द अवस्थेत आढळल्याने त्यास दवाउपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथे दाखल केले असता ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासून पाहून त्याचे निधन झाल्याची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

मयत अनोळखी इसमाचे वर्णन :- रंग सावळा, उंची 5 फूट 5 इंच, दाढी मिशी बारीक पांढरी वाढलेले, अंगात लाल मरुन व हल्क्या हिरव्या रंगाचा चेक्सचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पँट परिधान केलेला.

या मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कासारवडवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.के.खान यांनी केले आहे.

मयत अनोळखी बेवारस इसमाच्या वारस/नातेवाईकांचा शोध

अनोळखी इसम (अंदाजे वय 52 वर्षे) हा झोपलेल्या स्थितीत दिसून आल्याने व काही हालचाल होत नसल्याचे पाहून त्यास सिव्हील हॉस्पिटल, वागळे ईस्टेट, ठाणे येथे घेवून गेले असता तेथील ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासून दाखल करण्यापूर्वी त्याचे निधन झाल्याची नोंद ठाणे शहर कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

मयत अनोळखी इसमाचे वर्णन :- अंगाने सडपातळ,, रंग गोरा, नाक सरळ, केस काळे, अंदाजे उंची 5 फूट 6 इंच, अंगात निळ्या व काळ्या पट्ट्याचा फुल बाह्याचा टी शर्ट व काळी पँट दिसत आहे.

या मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे शहर कोपरी पोलीस पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे शहर कोपरी पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उप निरीक्षक व्ही. एस.कदम यांनी केले आहे.