शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 13 जानेवारी 2025

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालवधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

इथे क्लिक करा :  मध्य रेल्वे – १७१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिंकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

29 डिसेंबर 2023 व 25 जानेवारी 2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इथे क्लिक करा :  शिक्षणाचे वास्तव

अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत व 26 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत.

========================================================


========================================================