महाराष्ट्रातील भाजपाचा महाविजय देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणारा- अमित शहा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • शिर्डी, 13 जानेवारी 2025

काही निवडणुका देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणाऱ्या असतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हा महाविजय देशाच्या राजकारणास नवी दिशा देणारा ठरणार असून याची इतिहासात नोंद होणार आहे. पक्षाचे समर्पित कार्यकर्ते हे या महाविजयाचे खरे शिल्पकार आहेत. या देशात सिद्धान्ताची राजनीतीच चालेल हे दाखवून परिवारवादी राजकारणास महाराष्ट्राने जोरदार चपराक लगावली आहे. महाराष्ट्रातील हा महाविजय म्हणजे कार्यकर्त्यांचे समर्पण आणि मेहनतीचे फळ असून यापुढेही भाजपाच्या विजययात्रेत महाराष्ट्र सर्वात पुढे राहील असा विश्वास भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपाच्या महाविजय मेळाव्यात केला.

इथे क्लिक करा :  आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. शिवाजी महाराजांपासून सावरकर, टिळक व अनेक राष्ट्रपुरुषांचे स्मरण करून शहा यांनी महाराष्ट्रातील महाविजयाबद्दल कारकर्त्यांचे अभिनंदन केले. शरद पवार यांनी 1978 पासून सुरू केलेल्या दगाफटक्याची राजनीती 20 फूट जमिनीखाली गाडली आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये बाळासाहेबांची विचारधारा सोडून दगा देत खोटारडेपणाने मुख्यमंत्रीपद मिळविले, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, महाराष्ट्राच्या विजयातून एक मजबूत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार देण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी केले आहे, असे ते म्हणाले.

इथे क्लिक करा :  इमारतींची पडझड आणि उदासिनता

विधानसभेच्या निवडणुकीआधी शरद पवार पत्रकारांना निकालाचे भविष्य समजावून सांगत होते, आता निवडणुकीत काय झाले ते मी शरद पवार यांना समजावून सांगतो, असे सांगत अमित शहा यांनी राज्यातील भाजपाच्या महाविजयाची महाराष्ट्रातील विभागवार यादीच वाचून दाखविली. आमच्या सहयोगी पक्षांनाही या महाविजयातून महाराष्ट्राच्या जनतेने मजबूत केले असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे, हेही सिद्ध केले आहे, धोकेबाजीची राजनीती करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसविण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी या महाविजयाची प्रशंसा केली.

इथे क्लिक करा :  शिक्षणाचे वास्तव

महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीजींच्या राजनीतीला मान्यता दिली, सनातन संस्कृतीचा स्वीकार केला, हे सिद्ध झाले. 2024 च्या वर्षातच मोदीजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, हरियाणात आपण सलग तिसरा विजय प्राप्त केला, याच वर्षात आंध्रात प्रथमच रालोआचा विजय झाला, ओरिसामध्ये प्रथमच पूर्ण बहुमताचे आपले सरकार स्थापन झाले, 2024 च्या वर्षातच तिसऱ्यांदा सिक्कीममध्ये एनडीएला विजय मिळाला आणि त्याच वर्षात महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांचा सत्ता मिळाली. हे वर्ष भाजपाच्या इतिहासात नोंदले जाईल, पण आम्ही एवढ्यावर थांबणार नाही. आमचा बूथवरचा प्रत्येक योद्धा कार्यकर्ता हाच आमचा सेनापती आहे. महाराष्ट्रातील संघटनपर्व काहीशा विलंबाने सुरू झाले आहे. 40 लाख सदस्य झाले आहेत, दीड कोटींचे लक्ष्य आहे. कार्यकर्त्यांनी यासाठी कटिबद्ध राहून येत्या दीड महिन्यांत दीड कोटींहून अधिक सदस्य बनवावेत आणि प्रत्येक बूथचे शक्तिकेंद्रात परिवर्तन करावे, असे आवाहनही शहा यांनी केले. येत्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एकही जागेवर विजय मिळणार नाही याची खबरदारी घ्या. संपूर्ण विजय हाच खरा विजय असतो. विरोधकांना एकही जागेवर विजय मिळू न देता पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत सर्वत्र विजयाचे सूत्रधार व्हावे यासाठी आपण एकत्र आलो आहोत. तो प्राप्त करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक जागेवर विजय आणि प्रत्येक नागरिकास सदस्यत्व हा संकल्पही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.मजबूत भाजपा हे कार्यकर्त्यांचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. पन्नाप्रमुखापासून बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षापर्यंत प्रत्येकाने आपली सारी शक्ती संघटनेसाठी पणाला लावावी, लाडक्या बहिणी, शेतकरी, या सर्वांना सदस्य बनवू, आणि भविष्यात कोणीही आपला विश्वासघात करण्याची हिंमत करणार नाही अशी मजबूत पक्षउभारणी करून सर्वत्र भाजपाला विजयी करू व राष्ट्र प्रथम हा संकल्प साकार करू या असे आवाहनही त्यांनी केले.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सोडला होता. आता दुसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मिळून हा संकल्प पूर्ण करतील, प्रत्येक शेतात सिंचनाचे पाणी खेळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, पण त्यांना जे जमले नाही, ते आम्ही करून दाखविणार आहोत. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवितो, ही आमच्या पक्षाची परंपरा आहे. विरोधकांनी आता पाहातच रहावे, असे आव्हानही त्यांनी दिले. आम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे. अयोध्येतील रामलल्लाची मुक्तता करण्याची ग्वाही आम्ही दिली होती, कलम 370 समाप्त करण्याची ग्वाही दिली होती, ती पूर्ण केली आहे, देशातून दहशतवाद संपविला, 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवादही संपवू अशी ग्वाही त्यांनी दिली. गरीब कल्याण हा आमचा संकल्प आहे. सात कोटी गरीबांना घर, गॅस, वीज धान्य, पाणी आणि आरोग्य सुविधा देण्याचे कामही भाजपाने केले आहे, असे ते म्हणाले.

शहा म्हणाले, महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे. गडचिरोली, शक्तिपीठ महामार्ग, पुणे मुंबई मेट्रो विकास, समृद्धी महामार्ग, सांगली, जालना, संभाजीनगरातील विकास अशी अनेक कामे पाच वर्षांत भाजपा पूर्ण करून राज्याला समृद्ध करेल, यात शंका बाळगू नका, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुसरीकडे इंडिया आघाडीत दुफळी माजली आहे, संपूर्ण इंडिया आघाडी खिळखिळी झाली असून महाराष्ट्रातील भाजपाच्या महाविजयामुळेच त्यांचा आत्मविश्वास संपला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भाजपा एकामागून एक विजय मिळवत असून दिल्लीतही भाजपाचे सरकार येईल. 2024 ची अखेर भाजपाच्या विजयाने झाली, आणि 2025 ची सुरुवातही भाजपाच्या विजयानेच होईल. 2047 पर्यंत भारत हे संपूर्ण विकसित, सुरक्षित, समृद्ध राष्ट्र हा संकल्प आहे. विकसित महाराष्ट्राखेरीज हे स्वप्न साकार होणार नाही. कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे विकासाचे केंद्र आहे. येत्या भविष्यकाळात मोदीजींच्या नेतृवात असा महाराष्ट्र घडवू, आणि विश्वासघात करण्याची कोणाची हिंमतही होणार नाही, असेही शहा म्हणाले.

========================================================

  • अन्य बातम्यांचा मागोवा

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायल येथे रोजगाराची संधी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा

मयत अनोळखी बेवारस इसमाच्या वारस/नातेवाईकांचा शोध

एचएमपीव्ही” विषाणूला घाबरू नका..

स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन व्यक्तिमत्व घडवा

महाराष्ट्रातील भाजपाचा महाविजय देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणारा- अमित शहा

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

========================================================

 


========================================================