मनोरा, मॅजेस्टीक आणि अजिंठा निवास प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 9 जानेवारी 2025
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीचा सन्माननीय सदस्यांना योग्य प्रकारे परिचय करून देण्याचे निर्देश दिले आहेत. सभागृहातील सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी सर्व सुविधा आणि मार्गदर्शन तत्परतेने उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सध्याच्या बांधकाम प्रकल्पांवर बोलताना प्रा. शिंदे यांनी मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
इथे क्लिक करा : प्राणी प्रेम आणि स्वच्छता
आज विधानभवन येथे आयोजित कामकाज आढावा बैठकीत प्रा. शिंदे यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. बैठकीला विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-२ डॉ. विलास आठवले, तसेच सचिवालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- नवीन सुविधांचे वर्णन
मनोरा आमदार निवास प्रकल्पामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजनकक्ष, तसेच सदस्य व सहायकांसाठी प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध केली जात आहे. मॅजेस्टीक निवास वारसा वास्तूचे सौंदर्य कायम ठेवत आधुनिक पद्धतीने नुतनीकरण केले जात आहे. याशिवाय, मलबार हिल येथे अजिंठा बंगला प्रामुख्याने पीठासीन अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात येत असून, त्यात सर्व अत्याधुनिक सुविधा असतील.
इथे क्लिक करा : सायबर साक्षरतेची गरज
या सर्व प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करून सन्माननीय सदस्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता बाळगावी, असे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले.
========================================================
========================================================