- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
रत्नागिरी, हरळ, 5 जानेवारी 2025
राजापूर तालुक्यातील हरळ गावातील आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. गावातील बौद्ध वाडीतील नालंदा बुध्द विहारात यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्यात आले.
वाडीतील महिलांनी एकत्र येत सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा, त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना दिलेल्या साथीचा जागर केला. फुले दांपत्यांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला त्याप्रमाणे शिक्षणावर भरद्यायला हवा. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणी प्रमाणे एकत्र येत वाडीतील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा आणि पर्यायाने वाडीचा गावचा विकास करावा असं आवाहन अविरत वाटचाल न्यूज नेटवर्कच्या संपादक स्वप्ना हरळकर यांनी उपस्थित महिलांना केले.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांनी आजच्या पिढीला सहजीवनाची आणि एकमेकांच्या साथीने कार्यकर्तृत्वाचा आदर्श उभा केला आहे. त्याचप्रमाणे आजच्या तरूण पिढीने त्यांचे आदर्श घ्यावा. एकमेकांना साथ देण्याची भावना केवळ सहजीवनापुरतीच मर्यादित न राहता वाडीच्या विकासासाठीही असावी असं आवाहन विनायक हरळकर यांनी केले.
तर सावित्रीबाईनी महिलांना एकत्र आणले, तसेच वाडीतल्या महिलांनी एकत्र येत वाडीतल्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अनिरुद्ध हरळकर यांनी यावेळी महिलांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली हरळकर या होत्या. महिला मंडळाच्या सचिव प्रणिता जाधव, अनिता तांबे, सांची हरळकर, संगीता जाधव, नम्रता हरळकर, कविता हरळकर, विशाखा हरळकर, प्रभावती तांबे, शारदा हरळकर , वर्षा हरळकर , सुधा हरळकर, प्रेमा हरळकर, सोनाली जाधव आदी महिला यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरळ गावच्या ग्रामपंचायत सदस्य अनिता तांबे यांनी केले तर आभार प्रणिता जाधव यांनी केले.
========================================================
========================================================