खांदा कॉलनीतील सकल मराठा समाज बांधवांसाठी मोफत रुग्णवाहिका

मराठा क्रांती मोर्चाच्या भरत पाटील यांचा उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल, १५ डिसेंबर 2024

पनवेल महानगरनपालिका हद्दीतील खांदा कॉलनीतील सकल मराठा समाज बांधवांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे भरत पाटील यांनी दिली.

इथे क्लिक करा : सायबर साक्षरतेची गरज

अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवेळी रुग्णालयात जाण्यासाठी तातडीने वाहन वा एम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही आणि अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला वाचविणे शक्य होत नाही. आपल्या सकल मराठा बांधवांची होणारी गरज लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या भरत पाटील यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील खांदा कॉलनी परिसरातील सकल मराठा समाजाच्या बांधवांसाठीची मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.

इथे क्लिक करा : इमारतींची पडझड आणि उदासिनता

सकल मराठा समाज  बांधवांनी 9702393288 अथवा 9702918318 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन भरत पाटील यांनी केले आहे.

========================================================


========================================================