ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघांत 56.5 टक्के मतदान

अंबरनाथमध्ये सर्वाधिक कमी 47.75 टक्के तर भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वाधिक 69.1 टक्के मतदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 20 नोव्हेंबर 2024

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 56.4 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.  यामध्ये अंबरनाथ (140) विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे 47.75 टक्के मतदान झाले आहे तर सर्वाधिक जास्त मतदान भिवंडी ग्रामीण (134) विधानसभा मतदार संघात झाले आहे.

नवी मुंबईचा विचार करता ऐरोली (150) आणि बेलापूर (151) या दोन्ही मतदार संघात मतदानाने 50 टक्क्यांची आकडेवारी पार केली आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघात 51.5 टक्के मतदान झाले तर बेलापूरमध्ये 55.24 टक्के मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात झालेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणेः

========================================================


========================================================