- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 4 नोव्हेंबर 2024
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बेलापूर (151) विधानसभा मतदार संघातून 9 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या 15 एवढी झाली आहे.
बेलापूर विधानसभा मतदार संघात 24 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे सादर केले होते. त्यातील 24 उमेदवार वैध ठरले.मात्र शेवटच्या दिवशी कोणते उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आज शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.
उमेदवारी मागे घेणाऱ्यांची नावेः
1. निवास दिनकर साबळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
2. शेट्टी शांताराम कुकरा – अपक्ष
3. नवीन आनंदराव प्रतापे – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
4. अशोक अंकुश गावडे – अपक्ष
5. अक्रम बाबू हवालदार – अपक्ष
6. ॲड. गुरूदेव नरसिंग सूर्यवंशी – अपक्ष
7. राहुल शंकर शिरसाठ – अपक्ष
8. संतोष रघुनाथ कांबळे – अपक्ष
9. डॉ. अमरदिप पोपटराव गरड – अपक्ष
उमेदवारी कायम असलेली नावे पुढीलप्रमाणेः
१. विजय नाहटा (अपक्ष)
२. संदिप गणेश नाईक (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)
३. शर्मिला संजय पडिये (अपक्ष)
४. शिवशरण मालीकार्जुन पुजारी (बहुजन समाज पार्टी)
५. गजानन श्रीकृष्ण काळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
६. विष्णू नंदू वासमनी (अपक्ष)
७. विशाल आनंदराव माने (अपक्ष)
८. मंदा विजय म्हात्रे (भारतीय जनता पार्टी)
९. डॉ. महादेव सूकर मांगेला (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)
१०. डॉ. आमले मंगेश महादेव (अपक्ष)
११. डॉ. अजय राजश्री बाबूराम गुप्ता (संभाजी ब्रिगेड पार्टी)
१२. सुनिल प्रभू भोले (वंचित बहुजन आघाडी)
१३. मंदा संजय म्हात्रे (अपक्ष)
१४. प्रफुल्ल शारदा नारायण म्हात्रे (महाराष्ट्र राज्य समिती)
१५. संदिप प्रकाश नाईक (अपक्ष)
========================================================
========================================================