- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे , 4 नोव्हेंबर 2024
नवी मुंबईतील ऐरोली (150) विधानसभा मतदार संघात 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 3 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ऐरोली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 17 उमेदवार उरले असल्याची माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेणारे उमेदवार पुढीलप्रमाणेः
- करण मनोहर मढवी – शिवसेना उबाठा,
- ॲड.चेतन पाटील – अपक्ष,
- विनोद पोखरकर – अपक्ष
ऐरोली विधानसभा मतदार संघातून 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणेः
- राजीव कोंडीबा भोसले – अपक्ष,
- अंकुश सखाराम कदम- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,
- राहूल जगबीर सिंघ मेहरोलिया – अपक्ष,
- गणेश रामचंद्र नाईक – भारतीय जनता पार्टी,
- निलेश अरूण बाणखेले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
- सचिन ग्यानबा मगर – बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी,
- मनोहर कृष्ण मढवी- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),
- विक्रांत दयानंद चिकणे- वंचित बहुजन आघाडी,
- रत्नदीप तुळशीराम वाघमारे- अपक्ष,
- शरद रामकिसन जाधव – बहुजन मुक्ती पार्टी,
- अमोल अंकुश जावळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे),
- शरद दगडु देशमुख- संभाजी ब्रिगड,
- विजय लक्ष्मण चौगुले- अपक्ष,
- भुपेंद्र नारायण गवते – लोकराज्य पार्टी,
- हरिश्चंद्र भागुराम जाधव – बहुजन समाज पार्टी,
- अरविंद सिंह श्रीराम राव – बहुजन समाज पार्टी,
- सुभाष दिगंबर काळे – अपक्ष
========================================================
========================================================