- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 23 ऑक्टोबर 2024
ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 281 नामनिर्देशन पत्रांचे उमेदवारांना वाटप करण्यात आले आहे. तर 6 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
हे वाचा : एनएमएमटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत
134 भिवंडी विधानसभा मतदारसंघ – 6 अर्ज, 135 – शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ – 13 अर्ज, 136 – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 36 अर्ज, 137 – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ – 22 अर्ज, 138 – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 20 अर्ज, 139 – मुरबाड विधानसभा मतदारसंघ – 14 अर्ज, 140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – 6 अर्ज, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – 10 अर्ज, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – 25 अर्ज, 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – 9 अर्ज, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 28 अर्ज, 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ – 19 अर्ज, 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – 24 अर्ज, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – 13 अर्ज, 148 – ठाणे विधानसभा मतदारसंघ – 11 अर्ज , 149 – कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – 16 अर्ज, 150 – ऐरोली विधानसभा मतदारसंघ – 0 अर्ज, 151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघ – 9 अर्ज असे एकूण 281 अर्जाचे वाटप करण्यात आले.
हे वाचा : लेसर शो आणि डोळ्यांचे संरक्षण
- 135 शहापूर अ.ज विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अविनाश यशंवत शिंगे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे सादर केला.
- 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार वैजंता राजेंद्र पावशे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला.
- 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून समता पार्टीचे उमेदवार तृनेश अरूण देवळेकर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केला.
- 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनोज दिलिप सयानी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला.
- 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून समता पार्टीचे उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के- पाटील यांच्याकडे सादर केला.
- 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार निलेश अरुण सानप यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सादर केला.
========================================================