लेसर शो आणि डोळ्यांचे संरक्षण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मिरज : अलीकडे उत्सव , मिरवणुकांमध्ये लेझर शोज चे प्रमाण वाढले आहेत, त्यामुळे डोळ्याचे आरोग्य बिघडू शकते.डी जे च्या जोडीला ‘ लेझर शो ’ चा सर्रास वापर हल्ली बघायला मिळतो. लेसर लाईटकडे बघितल्याने डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन कायमस्वरूपी दृष्टिदोष होण्याची शक्यता असते. यापूर्वी डोळ्यात रक्तस्राव होणे व नेत्रपटलावर सूज येणे याप्रकारचे कित्येक रुग्ण नेत्रतज्ञांकडे आलेले आहेत. डोळ्याच्या नेत्रपटलावरील नाजूक रक्तवाहिन्यांवर लेझर थेटपणे पडल्यास रक्तस्रावचा धोका पोहचू शकतो व दृष्टी कमजोर होते.

‘अमेरीकन ऍकेडेमी ऑफ ऑप्थलमोलॉजी’ च्या अहवाला नुसार पाच मिली वॅट पेक्ष्या जास्त क्षमतेचे लेझर लाईट मुळे मुख्यत्वे नेत्रपटल खराब होऊन कायमस्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता असते. लेझर लाईटचा झोत वरच्या दिशेने किंवा आकाशाकडे असावा जेणेकरून लोकांच्या डोळ्यात तो शिरणार नाही . डोळ्याच्या बुबुळावर जखमा होणे , प्रकाश सहन न होणे, दृष्टी क्षीण होणे , डोळ्यातून पाणी येणे या प्रकारची व इतर लक्षणे दिसू शकतात .

हे देखील वाचा : शिक्षणाचे वास्तव

आजकाल लेसर पॉईंटर , लेसर शो आणि वेगवेगळ्या लेसर कटिंग किंवा लेसर एम्बॉसिंग मशीन मुळे सुद्धा दुर्घटना बघायला मिळतात. आणि बऱ्याचशा समारंभात जेथे लेसर शो किंवा देखावे असतात त्यात देखील या सारख्या घटना दिसतात.

पूर्वी कधी काही मिरवणूक किंवा समारंभ किंवा काही ऑलम्पिक खेळाचे आयोजन करताना किंवा उदघाट्न करताना नयनरम्य( ???? म्हणजे डोळ्यांना चांगले असे नाही ह… ! ) अशीं रोषणाई असायची . त्यात बऱ्याच ठिकाणी आग लागणे , ध्वनी प्रदूषण होणे , वायू प्रदूषण होणे अश्या बऱ्याच कारणामुळे त्या बदल्यात लेसर चा वापर सुरु झाला . आज पण परदेशात आणि आपल्या कडील मोठ्या शहरांत काही उंच इमारतींवर लेसर वापरून काही आकृत्या पण तयार केल्या जातात काही स्पेसिअल इफेक्ट तयार व्हावा यासाठी पण याचा वापर होतो हे सगळे लेसर शो मानवी डोळ्यांवर पडू नये म्हणून ते आकाशात किंवा एख्याद्या भिन्ती वर किंवा वस्तू वर चित्रित केले जायचे.

  • आता थोडं लेसर चे वर्गीकरण बघू

क्लास १ – यात लेसर प्रिंटर, CD प्लेअर या सारख्या वस्तू येतात ज्यामध्ये लेसर त्या प्रॉडक्ट मधेच असतात.
क्लास २– यात बार कोड स्कॅनर येतात
क्लास ३ अ – यात लेसर पॉईंटर येतात जो आपण प्रेझेंटेशन ला वापरतो
क्लास ३ ब –अँड क्लास ४ यात लेसर light शो , इंडस्ट्रियल लेसर आणि रिसर्च लेसर मोडतात जसे कि मेडिकल ग्रेड लेसर जे आय (डोळ्यांसाठी ) ट्रीटमेंट किंवा स्किन ट्रीटमेंट साठी पण वापरतात
क्लास ३ आणि ४ हे मानवी शरीराला धोकादायक आहेत त्यात प्रामुख्याने स्किन आणि डोळे हे नाजूक भाग जास्त रिस्क वर असतात .हे वर्गीकरण आणि त्याचे दुष्परिणाम तुम्ही अमेरिकन F D A आणि भाभा अनुसंधान केंद्राच्या अधिकृत वेब साईट वर बघू शकतात. म्हणून प्रत्येक लेसर उपकरणावर HAZARDOUS असे चिन्हं लिहिलेले असते . आता तंबाखू च्या पुडीवर कॅन्सर चे फोटो असतील तरी ते आपण खातो तर लेसर वरचे हे HAZARDOUS चे चिन्ह पहायची तसदी घेणार कोण ?

लेसर हे ग्रीन ,रेड अँड येलो या तीन रंगाचे असतात हे रंग वेगवेगळ्या वेव्ह लेंग्थ मुळे असतात . आता हे रंग विविध पॅटर्न आणि आकृत्या तयार करतात  आणि एक visual प्रतिकृती तयार करतात.

हे झालं थोडं टेक्निकल. बर हे डोळ्यांनाच का बरं आघात करतात ? कारण डोळ्यांना लेन्स असते जी बाहेरील प्रत्येक किरण रेटिनावर फोकस करते ; जस आपण लहानपणी भिंग द्वारे सूर्याचा प्रकाश एका ठिकाणी आणून कागद पेटवायचो . मागच्याच वर्षी लेसर मुळे धुळ्यात काही जणांचे मोबाईल कॅमेरे देखील जळाले होते . आणि डोळा हा तर 576 मेगा पिक्सेल चा देवाने दिलेला कॅमेरा आहे .आपण मोबाइलला चा कॅमेरा किती जपतो पण डोळ्यांना का नाही जपत या लेसर पासून देव जाणे !

लेसर हि एक दुधारी तलवार आहे त्याचा योग्य वापर ,योग्य कामांसाठी ,योग्य वेळेत आणि योग्य कालावधी साठी झाला तरच तो सदुपयोगी असतो अन्यथा याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

  • खालीत गोष्टीचे पालन केल्यास डोळ्यांना होणारी इजा टाळता येईल.

१. लेझर लाईट पाच मिलीवॅट पेक्षा कमीचा असावा .
२. लेसर लाईट पासून दूर राह‌णे , थेट लेसर लाईट डोळ्यात शिरणार नाही याची काळजी घेणे. मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
३. लेझर लाईटचा झोत वरच्या दिशेने किंवा आकाशाकडे असावा जेणेकरून लोकांच्या डोळ्यात त्याचा थेट शिरकाव होणार नाही .
४.‘लेझर शो’ ची नोंदणी व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सक्ती करावी.
५. लेझर लाईटमुळे कोणालाही डोळ्याच्या तक्रारी असतील तर त्यांना ताबडतोब नेत्रतज्ञाच्या सल्याने उपचार करावा.

डॉ. अक्षय कर्डिले
M.B.B.S.
M.S. Ophthalmology ( नेत्रशल्य चिकित्सक)
+91 89834 19441

=======================================================


========================================================