- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 26 सप्टेंबर 2024
हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ठाणे जिल्हा प्रशासनाने 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.
25 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळू लागल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरांची लाईफलाइन मानली जाणाऱ्या रेल्वे सेवेचाही बोजवारा उडाला. त्यामुळे नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाले.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आदी ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पालघरमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसेल, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने २६ सप्टेंबर रोजी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगार यांनी कळविल्याची माहिती ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली.
========================================================
========================================================