घणसोली डेपोत बस धुण्यासाठी सांडपाण्याचा वापर होत असल्याची इंटकची तक्रार

महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष घालण्याची रविंद्र सावंत यांची मागणी 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 सप्टेंबर 2024

महापालिका परिवहन विभागाच्या घणसोली डेपो बस धुण्यासाठी पाण्यात सांडपाणी मिश्रीत पाणी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्याची लेखी तक्रार नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे निवेदनातून करताना या समस्येचे तात्काळ निवारण करण्याची मागणी केली आहे.

हे वाचा : NMMT बस धावणार अटल सेतू मार्गावरुन

महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस नवी मुंबई कार्यक्षेत्रासह बदलापूर, ठाणे, पनवेल, उरणसह मुंबईत अनेक ठिकाणी प्रवासी सुविधा देत आहेत. या बसेस दिवसभर फिरल्यावर डेपोमध्ये धुण्यासाठी येत असतात. एकतर प्रवासामुळे बसेस अस्वच्छ आणि  धुळीने माखलेल्या असतात. महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागातील ठोक मानधनावरील कर्मचारी व रोजंदारीवरील कर्मचारी त्या बसेस धुण्याचे काम करत असतात.

हे वाचा :  नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदव्युत्तर पदवी वैदयकीय महाविदयालयाला परवानी

गेल्या काही दिवसापासून बसेस धुण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध होणारे पाणी खराब असून ते मल:मिश्रीत सांडपाणी आहे. परिवहन उपक्रमाच्या बसेस धुण्यासाठी मल:मिश्रीत पाणी येत असल्याने त्याच पाण्यात वावरुन कर्मचाऱ्यांना बसेस धुवाव्या लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाण्यात मल पाहून कर्मचाऱ्यांना उलट्या होत आहे.

 

हे वाचा : इमारतींची पडझड आणि उदासिनता

कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यावर मी स्वत: घणसोली डेपोत जाऊन खातरजमा केल्यावर सांडपाणी असल्याची खातरजमा केली आहे. त्या पाण्याचे व्हिडिओदेखील मी काढले आहेत. आपणास हवे असल्यास मी ते व्हिडीओ सादर करु शकतो, असे

कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

हे वाचा : शिक्षणाचे वास्तव

परिवहन उपक्रमातील घणसोली डेपोत बसेस धुण्यासाठी वापरण्यात येणारे मल:मिश्रीत पाणी आहे. या समस्येचे तातडीने निवारण करणे आवश्यक आहे. याप्रकरणाची चौकशी करुन मल:मिश्रीत पाणी या समस्येतून कर्मचाऱ्यांची मुक्तता करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

========================================================


========================================================