शिवसेना उपनेते विजय नाहटा  यांनी कार्यकर्त्यांसह घेतले एकविरा मातेचे दर्शन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 17 सप्टेंबर 2024

 

गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्त बांधवांचा गर्जेपोटी घरायांचा प्रश्न मार्गी लागल्या मुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवात उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यात यावेत म्हणून सातत्याने प्रयत्नशील असणारे शिवसेना उपनेते विजय नाहटा  यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.स्थानिकांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या प्रश्नात अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे आजवर हा प्रश्न मागे पडत होता.परंतु तांत्रिक बाजूची जाण असणारे आणि आजवर प्रशासनात उच्च पदावर काम केले असल्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचे विजय नाहटा यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवांना शब्द दिला होता.  मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांनीही नगरविकास मंत्री असतांनाच हा प्रश्न सोडवला होता. परंतु अध्यादेश काढण्यासाठी थोडा विलंब लागत होता. प्रकल्पग्रस्त बांधवांच्या जिव्हाळ्याचा असणारा खासदार नरेश म्हस्के, .विजय नाहटा , किशोर पाटकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री शिंदे  , सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंगल, नगर विकासाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी वारंवार मिटिंगा करून अध्यादेशाचा मार्ग मोकळा करुन घेतला आहे. त्याबाबत एकविरा आईचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि एकविरा आईचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा आपल्या कार्यकर्त्यांसह कार्लागाव येथे दाखल झाले होते. यावेळी  सोबत माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार,  सरोज पाटील, दीपक सिंग,आतिष घरत, भावेश पाटील,शिरीष पाटील, संजय वासकर, निहाल वास्कर,दीपेश म्हात्रे,कल्पेश पाटील,मिथुन पाटील,मनोज भोईर,दिलीप ठाकूर,बाळा पाटील, संजय भोईर,जयेश वाजंत्री,विवेक सुतार,तुषार पाटील,आकाश पाटील, महिला पदाधिकारी,गीता पाटील,स्मिता सुर्वे,स्नेहा पवार इत्यादी उपस्थीत होते. कारले गाव एकविरा देवी मंदिर प्रशासनाच्या वतीने विजय नाहटा आणि सह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.