गणपती उत्सवासाठी अनारक्षित विशेष गाड्यांच्या १४ अतिरिक्त सेवा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 12 सप्टेंबर 2024
गणपती उत्सवादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने  गणपती भक्तांसाठी १४ अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -खेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित विशेष (२ सेवा)
01069 अनारक्षित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून आज रात्री ११.३० वाजता सुटेल आणि खेड येथे उद्या पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)
01070 अनारक्षित विशेष खेड येथून १६ सप्टेंबर रोजी पहाटे ६  वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
गाडीचे थांबे:
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक.
डब्यांची रचना:
४ शयनयान आणि २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी (२० डब्बे)

 पनवेल -खेड – पनवेल अनारक्षित विशेष (६ सेवा)
01071 अनारक्षित विशेष पनवेल येथून १३,१४,१५ सप्टेंबर रोजी  सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. (३ सेवा)
01072 अनारक्षित विशेष १३, १४,१५ सप्टेंबर रोजी खेड येथून संध्याकाळी ३.१५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
गाडीचे थांबे:
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक.
डब्यांची रचना:
४ शयनयान आणि २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी (२० डब्बे)

पनवेल -खेड – पनवेल अनारक्षित विशेष (६ फेऱ्या)
01073 अनारक्षित विशेष पनवेल येथून १३,१४,१५ सप्टेंबर रोजी रात्री ९.१० वाजता सुटेल आणि खेड येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजता पोहोचेल. (३ सेवा)
01074 अनारक्षित विशेष १३,१४,१५ सप्टेंबर रोजी खेड येथून पहाटे ६ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
गाडीचे थांबे:
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक.
डब्यांची रचना:
४ शयनयान आणि २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी (२० डब्बे)
प्रवाशांना विनंती आहे की, वरील सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालणार असून अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह ट्रेन सुटण्यापूर्वी यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
========================================================

========================================================